खारवी समाजाबाबत आमदार भास्कर जाधव म्हणाले,  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने शृंगारतळीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेचे उपसभापती महेश नाटेकर, विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव आणि उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार उपस्थित होते. संजय पवार यांनी आढावा बैठकीचा उद्देश सांगितला.

गुहागर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील बागायतदार, शेतकरी, मजूर, कारागीर यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आजपर्यंत सरकारकडून मदत मिळालेली आहे; मात्र खारवी समाजाला आजपर्यंत कोणतीच मदत किंवा भरपाई मिळालेली नाही, अशी खंत आमदार भास्कर जाधव व्यक्त केली. 

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने शृंगारतळीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेचे उपसभापती महेश नाटेकर, विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव आणि उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार उपस्थित होते. संजय पवार यांनी आढावा बैठकीचा उद्देश सांगितला.

चक्रीवादळात उधाणाच्या भरतीने अनेक तालुक्‍यांच्या किनारपट्टीतील अनेक धूपप्रतिबंधक बंधारे उद्‌ध्वस्त झाले; मात्र याबाबत पंचनामे झालेले नाहीत, असे काही सरपंचांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर जाधव यांनी बंदर विकास अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. तालुक्‍यात खताचा तुटवडा आहे, याची माहिती सरपंचांनी दिली. त्यावर याची कल्पना मला कृषी अधिकाऱ्यांनी आधीच दिली असती तर मी तातडीने खत उपलब्ध करून दिले असते, असे सांगत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून खत उपलब्ध करून द्यावे, तसेच याची माहिती द्यावी, अशी सूचना जाधव यांनी केली.

खारवी समाजासाठी स्मार्ट कार्ड देण्यासाठी प्रयत्नशील आहेच, शिवाय त्यांच्यासाठी एक योजना आणली असून यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली जाईल, असे जाधव यांनी सांगितले. 

वीज खांबावर चढण्यासाठी आवश्‍यक स्लिपरच्या बॉक्‍स उपकरणांचा तुडवडा असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता गणेश गलांडे यांनी दिली. त्यावर उपकरणे वाढवून देण्यासाठी जि. प. उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह सभापती, उपसभापती आणि तालुक्‍यातील जिल्हा परिषद सदस्य आर्थिक स्वरूपात मदत करतील, असा शब्द त्यांनी शब्द दिला.

या बैठकीला तहसीलदार लता धोत्रे, पोलिस निरीक्षक अरविंद बोडके, नगरपंचायत मुख्याधिकारी कविता बोरकर, गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, पंचायत समिती सभापती विभावरी मुळ्ये आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhaskar jadhav Comments About Kharvi Community