
गुहागर : आक्रमक नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधवांमधल्या हळव्या पित्याचे रूप पाहावयास मिळाले. गेली आठ वर्ष ही मुलगी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरी कामाला होती. जाधव कुटुंबाने आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलेल्या या मुलीचे नुकतेच लग्न झाले. तिच्या लग्नानंतर (Marriage) जाधव कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आली त्या वेळी तिला निरोप देताना जाधव यांना अश्रू अनावर झाले.