राणे म्हणाले, बोललो ते चुकीचे असेल तर...

MLA Nitesh Rane Comment On Corona Lab Sindhudurg Marathi News
MLA Nitesh Rane Comment On Corona Lab Sindhudurg Marathi News

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - मी बोललो ते चुकीचे असेल तर कारवाईला सामोरे जाईन. लॅबमधील रिपोर्ट चुकीचे येतात, उशिराने येतात मग लॅबबाबत राजकारण का? स्थानिक जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. जर चार महिने कोरोना टेस्टींग लॅबची मागणी करत असाल तर तयारी का झाली नाही ? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. 
ओसरगाव येथील महिला भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, "" मुंबईसह इतर भागातून सिंधुदुर्गात आलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जे लोक क्वारंटाईन आहेत त्यांची स्वॅब टेस्ट अद्याप आलेले नाही. मग तुमच्या ज्या बैठका झाल्या त्याचा जनतेला काय फायदा झाला ? जिल्हा परिषद शाळांमधील क्वारंटाईन कक्षांची काय अवस्था आहे, तिथे सकाळच्या सत्रात शिक्षक असतात रात्रीचे कोणीही नसते लोक गावभर फिरतात. याबाबतचे माझ्याकडे पुरावे आहेत. जिल्ह्यात 35 हजार लोक आले असतील तर त्यांना पास कोणी दिले. मुंबईच्या सीपी ऑफिसने पास जारी केले असतील तर त्या लोकांची यादी सिंधुदुर्गाकडे का पाठवली नाही ? '' 

ते म्हणाले, "" नवीन लोक येत आहेत यावर आराखडा तयार का केला जात नाही, आता तर शाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाली आहे. या शाळांमध्ये लोकांना संस्थात्मक विलगिकरण करून ठेवले त्याच शाळात मुले पाठवणार कशी ? मुंबईतून गावाकडे येण्यासाठी अवघ्या तीन तासात पास मिळतो कसा याची चौकशी का होत नाही हा आमचा सवाल आहे. आम्ही विरोधक असलो तरी राजकारण करत नाही. सहकार्याची आमची भूमिका आहे; पण तुम्ही काहीच करत नसाल नुसत्याच बैठका घेत असाल तर आम्ही गप्प बसायचे का ? नितेश राणे दहा लाख गोळ्यांचे वाटप करत असेल तर तुम्ही 20 लाख गोळ्यांचे वाटप करा; पण लोकांच्या आयुष्याशी खेळू नका. पावसाळा जवळ आलाय साथीचे रोग येणार, रस्त्यांवरील खड्डे भरणार कोण ? पाणीटंचाईच्या आराखड्याबाबत चर्चा तरी केलात काय ?'' 

"" इथल्या जनतेच्या आयुष्याशी खेळू नका. जिल्ह्यातील लोकांनी आम्हाला खूप काही दिले आहे. आमच्यावर राग काढा; पण जिल्ह्यासाठी काहीतरी करा. आज जिल्हा अडचणीत आहे. लोक टाईम बॉम्बवर बसलेले आहेत. हा बॉम्ब कधीही फुटू शकतो. आम्हाला इथे राहायचे आहे. केरळच्या परिचारिकांना 20 लाखांचे पॅकेज दिले जाते. हा पैसा राज्य सरकारकडे असेल तर आमच्या लोकांसाठी तो पैसा का नाही ? गावातील नियंत्रण समितीला का पैसे देत नाहीत. सरपंच आपल्या खिशातले पैसे खर्च करत आहेत. याबाबत कोणता आराखडा तुमच्याकडे आहे ? '' 
- नीतेश राणे, आमदार 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com