"नारायण राणे" नावाचा दबदबा कायम ; सत्ता असो की नसो

शिवप्रसाद देसाई
Friday, 16 October 2020

नितेश राणे यांनी शासकीय मेडीकल काॅलेज मंजूरीही राणेंमुळेच झाल्याचे म्हटले आहे.

सावंतवाडी : माझा नेता लय पॉवरफुल ! अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत व्टिट करून प्रतिक्रिया दिली आहे. हे महाविद्यालय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडीकल काॅलेजच्या अगदी जवळ मंजूर झाले आहे. याच्या मंजूरीचे श्रेय शिवसेनेने घेतले आहे. 

सिंधुदुर्गात शासकीय मेडीकल काॅलेजची मागणी होत होती. या काॅलेजमुळे जिल्ह्यात सुसज्ज हाॅस्पीटल मिळणार होत. याला काल मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. याचे श्रेय शिवसेनेने घेतले. पेढे वाटून आणि फटाके फोडून त्यांनी आनंद व्यक्त केला. हे काॅलेज ओरोसला होणार आहे. येथून जवळच पडवे येथे राणेंचे मेडीकल काॅलेज आहे. तिथे सुसज्ज हाॅस्पीटलही आहे.

 

या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी शासकीय मेडीकल काॅलेज मंजूरीही राणेंमुळेच झाल्याचे म्हटले आहे. त्यानी ट्विट केले आहे की,"नारायण राणे" या नावाचा दबदबा सत्ता असो की नसो.. सिंधुदुर्ग च्या राजकीय प्रवासात 1990 पासुन कोणच थांबवु शकले नाही..या तर प्रकल्प राणेंच्या माध्यमातुन होतात किंवा त्यांच्या मुळे केले जातात.शेवटी सगळ काही एकाच व्यक्तिच्या मुळे ! 

संपादन - अर्चना बनगे
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane has responded by tweeting about the government medical college sanctioned in Sindhudurg