'महाविकास आघाडीने कोकणातील जनतेवर सूड उगवला'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

 राज्य सरकारच्या उद्योग खात्याने मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणुकीचा मोठा गाजावाजा केला खरा, पण

कणकवली (सिंधुदुर्ग) :  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोकणातील जनतेवर सूड उगवला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमातून जी गुंतवणूक केली त्यातील 77 टक्के गुंतवणूक केवळ ठाणे पालघर, रायगडसाठी आहे. मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक रुपया ही गुंतवणूक झाली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील तरुणाने रोजगारासाठी काय करावे असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

 राज्य सरकारच्या उद्योग खात्याने मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणुकीचा मोठा गाजावाजा केला खरा, पण सिंधुदुर्गाच्या वाट्याला काही आलेले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसी प्रकल्पासाठी एक रुपयाची गुंतवणूक या कार्यक्रमात झालेली नाही सत्ताधाऱ्यांनी एक रुपयाची गुंतवणूक न केल्याने इथला तरुण रोजगारापासून दूर फेकला जाणार आहे सत्तेत महाविकासआघाडी आल्यानंतर वर्षभरात कोरोना होता.पण आता या सरकारने गुंतवणुकीसाठी तोंडाला पाने पुसले नाही. सिंधुदुर्गातील सी - वर्ल्ड प्रकल्प किंवा नाणार प्रकल्प याबाबत काही बोललेले नाहीत. सिंधुदुर्गाचे दरडोई उत्पन्न हे राज्याच्या पाचव्या क्रमांकाचे होते आता ते टिकणार कसे,  रोजगाराचे पुढे काय याची माहिती पालकमंत्र्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जनतेला द्यावी उद्योगमंत्री दोडामार्ग च्या एमआयडीसीमध्ये का गुंतवणूक केली नाही हे सांगावे,  कोकण म्हणजे रायगड पर्यंत जिल्हा का सिंधुदुर्ग-रत्नागिरी ने काय केले आहे. या जिल्ह्यात बेरोजगारी वाढत आहे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या चाकरमानी गावाकडे परतले आहेत त्यांचं काय सिंधुदुर्गातील पर्यटन विकास होत असताना अजूनही वाटरस्पोर्ट ला परवानगी दिलेली नाही व्यवसाय करण्याची वेळ असताना राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा- बिनविरोध ग्रामपंचायतीची ६२ वर्षांची परंपरा ; यंदाही परंपरा टिकवणार
 

चिपी विमानतळ जानेवारीमध्ये सुरू होणार आहे तेथे रोजगाराची संधी मिळावी अशी अपेक्षा जिल्हावासियांची आहे मात्र जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणारे प्रशिक्षण दिले जात नाही ते तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. नाणार प्रकल्प वर  बोलताना असे राणे म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांना नाणार प्रकल्प नको असला तरी त्यांचे आमदार या प्रकल्पाला समर्थन करत आहेत. सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही प्रकल्पाच्या बाजूने होती त्यांनी आपली भूमिका मांडावी.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane in a press conference kankavli