esakal | नीतेश राणेंसह 19 जणांची कारागृहातून सुटका 
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane

नीतेश राणेंसह 19 जणांना बुधवार जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानतर त्यांची सुटका करण्यात आली. मी नागरिकांसाठी आंदोलन केले आणि मला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे राणे यांनी सुटकेनंतर सांगितले.

नीतेश राणेंसह 19 जणांची कारागृहातून सुटका 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेकप्रकरणी कारागृहात असलेले आमदार नीतेश राणे यांच्यासह 19 जणांची बुधवारी रात्री सावंतवाडी कारागृहातून सुटका करण्यात आली.

नीतेश राणेंसह 19 जणांना बुधवार जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानतर त्यांची सुटका करण्यात आली. मी नागरिकांसाठी आंदोलन केले आणि मला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे राणे यांनी सुटकेनंतर सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिखलमय महामार्ग आणि त्यामुळे येथील जनतेमध्ये त्याविरोधात निर्माण झालेला संताप यातून ही घटना घडली होती. यात गुन्हा करण्याचा उद्देश नव्हता, अशी बाजू या न्यायालयासमोर ऍड. संग्राम देसाई, ऍड. उमेश सावंत, ऍड. राजेंद्र रावराणे यांनी मांडली. न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली होती. अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, पोलिसांना तपासात सहकार्य करणे, आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावणे, या अटींवर या न्यायालयाने हा जामीन अर्ज मंजूर केला आहे. 

चंद्रकांत पाटलांना उत्तर देण्याची गरज नाही
चंद्रकांत पाटील यांच्याशी आमचे चांगले सबंध आहेत. ते ज्येष्ठ नेते असून, मी जे बोलले नाही त्याबाबत पोलिस तपास करतील. ते माझ्याबद्दल कशासाठी बोलले याला मला उत्तर देण्याचे काही कारण नाही, असे नीतेश राणे यांनी सांगितले. 

loading image