राणे म्हणतात सिंधुदुर्गात होतो कोरोना रिपोर्टमध्ये चमत्कार .....कसा तो वाचा..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

नितेश राणे यांनी केले ट्विट अन् सिंधुदुर्ग परिसरात माजली खळबळ... 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा रिपोर्ट एका तासात पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी ट्विटरद्वारे करत या सरकारवर विश्‍वास कोण ठेवणार ? असा सवाल करून प्रशासनाला जाब विचारला आहे.

हेही वाचा- ब्रेकिंग : तुंगजवळ चिमुरडीचा गळा आवळून निर्घृण खून

सिंधुदुर्गात आतापर्यंत कोरोनाचे आठ रूग्ण सापडले आहेत. येथे कोरोनाची संभाव्य लक्षणे आढळल्यास रूग्णाचे स्वॅब नमुने कोल्हापूरला पाठवले जातात. 20 तारखेला आलेल्या एका रूग्णाच्या कोरोना चाचणी अहवालाबाबत नीतेश राणे यांनी काल (ता.20) उशिरा ‘या सरकारवर कोण विश्‍वास ठेवणार ? एका महिलेचा रिपोर्ट पहिला पॉझिटीव्ह आणि मग एक तासात निगेटिव्ह होतो ? सिंधुदुर्गात होतो हा चमत्कार’ असे खोचक ट्विट केले आहे. या ट्विट सोबत त्यांनी संबंधित रिपोर्टही जोडले आहेत. याबाबत प्रशासन काय खुलासा करते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहेत.:


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA nitesh rane tweet about miracle in corona report