esakal | 'नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते; त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला बाळासाहेबांच नाव द्यावं'
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Nitesh  Rane tweet  narayan rane dream project chifi airport named after Balasaheb  Thackeray

चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

'नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते; त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला बाळासाहेबांच नाव द्यावं'

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी :  चिपी (ता. वेंगुर्ले) येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी चक्क आमदार नितेश नारायण राणे यांनी व्टिट करून केली आहे. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
हे व्टिट उपरोधीकही आहे. यात या विमानतळाचे श्रेय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांनी दिले आहे. व्टिटमध्ये ते म्हणतात “सन्माननिय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणूनच या विमानतळाला ‘स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ‘ हे नाव दिले पाहिजे असे माझे वैयक्तीक मत आहे.’ 


या विमानतळाच्या मंजुरीची प्रक्रिया राणे पालकमंत्री असताना झाली. ते या प्रकल्पासाठी आग्रही होते. त्यांच्याच काळात कामही सुरू झाले; मात्र नंतर सत्तासमिकरणे बदलली. राणेंचे विरोधक सत्ताधारी बनले. विमानतळाचे काम सुरूच राहिले. याच्या उद्घाटनावरून आतापर्यंत अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात याचे औपचारीक उद्घाटनही झाले होते. हा प्रकल्प केंद्राकडून प्रलंबीत काही परवानग्यांमुळे अडकला होता. आता ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे.

26 जानेवारीला प्रकल्प सुरू करण्याचा मुहुर्तही मिळाला आहे. या प्रक्रियेत सध्या शिवसेनेचे नेते सक्रिय आहे. विशेषतः खासदार विनायक राऊत याचा पाठपुरावा करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार राणे यांनी चक्क शिवसेना प्रमुखांचे नाव या विमानतळाला द्यावे अशी मागणी केली आहे; मात्र ही मागणी करताना राणे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे बाळासाहेबांचे नाव द्या, असेही म्हटले आहे.

संपादन- अर्चना बनगे