

Agri Empowerment: MLA Ravindra Patil Distributes Farm Equipments in Sudhagad
Sakal
पाली : रायगड जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती सुधागड पाली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पंचायत समिती सुधागड पाली येथे तालुकास्तरीय कृषी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेंद्रिय शेती ही काळाची गरज प्रतिपादन आमदार रवींद्र पाटील यांनी केले.