माझ्या विजयात खेतल यांचा मोलाचा वाटा - आमदार चव्हाण

संदेश सप्रे
गुरुवार, 16 मे 2019

देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 

चव्हाण म्हणाले, 2004 नंतरचा काळ चिपळूण शिवसेनेसाठी अवघड होता. पण शिवसैनिकांच्या ताकदीवर मी आमदार झालो. राजकारणात राजयोग लागतोच. भास्कर जाधव शिवसेनेतून बाहेर पडले व गुहागरात गेले, डॉ. विनय नातू इकडे आले नाहीत. उत्सवाचे आयोजक व भाजप उपाध्यक्ष तुषार खेतल यांनी, आता आपली युती झालीय, राजकारणात राजयोग महत्त्वाचा असतो, विधानसभेला काय होतेय ते पाहू अशी गुगली टाकत आता काळजी नको अशा शब्दात आमदार चव्हाण यांना आश्वस्त केले. 

चव्हाण यांनी वेताळेश्वराचे दर्शन घेतले. प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष तुषार खेतल यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी विकी लवेकर, संजय कांबळे, बोबडे यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. यात्रोत्सवात खासदार राऊत, रवींद्र माने, नेहा माने, सुभाष बने, आमदार राजन साळवी आदींचा खेतल प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यात्रोत्सवात पहिल्या दिवशी धार्मिक विधी पार पडले. पालखी नृत्य स्पर्धेत वीसहून अधिक संघानी सहभाग सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी कोकणचा साज संगमेश्वरी बाजच्या कलाकारांनी रसिकांनी खिळवून ठेवले. शेवटच्या दिवशी लावण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sadanand Chavan comment