"लोटेचे भोपाळ होण्यास वेळ लागणार नाही"

MLA Sanjay Kadam Vaibhav Khedekar Mayor of Khed criticism on Lotte MIDC ratnagirri marathi news
MLA Sanjay Kadam Vaibhav Khedekar Mayor of Khed criticism on Lotte MIDC ratnagirri marathi news

खेड  (रत्नागिरी): लोटे एमआयडीसीमध्ये होणाऱ्या दुर्घटना पाहता त्याचे भोपाळ होणार का? असा प्रश्‍न एक लोकप्रतिनिधी म्हणून मला पडला आहे. सातत्याने येथे अपघात होत आहेत. त्या अपघातावर नियंत्रण कोणाचेही राहिलेले नाही, अशी प्रतिक्रिया खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली.


घरडातील अपघातानंतर ते म्हणाले, सुप्रिया लाईफ कंपनीत दोन दिवसापूर्वीच असाच अपघात झाला. त्यापूर्वी पुष्कर केमिकल्समध्येही वायू दुर्घटना घडली. अनेक लोकांना या वायूचा त्रास झाला पण सरकारने या घटनांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. जर सरकार याकडे कानाडोळा करत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना येथील कामगारांच्या मागे खंबीर उभी आहे. त्यांनी घाबरू नये, असेही त्यांनी सांगितले.


माजी आमदार संजय कदम म्हणाले की, वायू प्रदुषणामुळे या परिसरातील 81 जणांना कर्करोग झाला आहे. या कॅन्सरग्रस्तांना कंपनी व्यवस्थापन कोणती मदत देणार आहे का विचारता, नाही असे उत्तर कंपनी देते मग याला जबाबदार कोण? प्रदुषणामुळे हे सर्व काही घडत आहे, असा आरोप त्यांनी केला. कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला असून अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे म्हणून मंगळवारी (ता. 23 मार्चला) कंपनीच्या प्रदुषणाविरोधात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रिया केमिकलकडे केटामाईन हा अंमली पदार्थ का आला याची चौकशी न करता केवळ गुन्हे दाखल झाले असे होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काहीही करत नाहीत.

घरडा एक जबाबदार कंपनी 
घरडा कंपनी एक जबाबदार कंपनी असून गेली अनेक वर्षे या भागात कार्यरत आहे. गेल्या वीस वर्षात अशी घटना येथे घडलेली नाही, अशी प्रतिक्रिया आवाशीचे सरपंच राज आंब्रे यांनी दिली. ते म्हणाले, दुर्घटना का व कशी झाली, याची माहिती कंपनी व्यवस्थापन घेत आहे. त्यानंतर नेमके कारण समजणार आहे. कंपनी सुरक्षेची संपूर्ण काळजी आतापर्यंत घेत आली आहे, असे त्यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com