esakal | सप्टेंबरपूर्वी होणार रत्नागिरीतील वाळू गटाचा लिलाव
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shekhar Nikam information Auction of the group reserved for manual sand extraction before September

शेखर निकम ; 3700 रुपये ब्रासने वाळू मिळणार

सप्टेंबरपूर्वी होणार रत्नागिरीतील वाळू गटाचा लिलाव

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : हातपाटीने वाळूचा उपसा करण्यासाठी आरक्षित असलेल्या गटाचे लिलाव एक सप्टेंबरपूर्वी होतील. अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली. वाळू गटाचा लिलाव झाल्यानंतर बांधकामासाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल त्याशिवाय तरूणांना यातून रोजगार उपलब्ध होईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाळूचा स्वस्त दर निश्‍चित करण्यात यश मिळाल्याचे आमदार निकम यांनी सांगितले. 


यावर्षी वाळू गटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो तरूणांचा रोजगार ठप्प झाला. काही तरूण महाडमधून वाळू आणून स्थानिक व्यवसायिकांना विकत आहेत. मात्र महाडच्या वाळूचे दर जास्त असल्यामुळे ज्यांना शक्य आहे असेच व्यवसायिक महाडची वाळू घेत आहेत. वाळू मिळत नाही तसेच महाग वाळू परवडत नाही म्हणून अनेकांचे बांधकामही ठप्प आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात हातपाटी आणि डुबीने वाळू उपसा करण्याची परवानगी मिळावी तसेच वाळूचे दर निश्‍चित करण्यात यावे. अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे अधिवेशना दरम्यान केली होती.

हेही वाचा- Good News - रत्नागिरीत केंद्राच्या या स्कीमचा हजारो उद्योजकांना फायदा -

काही दिवसापूर्वी आमदार निकम यांनी महसूलमंत्री थोरात यांची भेट घेवून याविषयाकडे त्यांचे लक्ष वेधले. कोरोनामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहे. बांधकाम व्यवसायालाही उतरती कळा लागली आहे. त्यामुळे स्वस्त दरात वाळू उपलब्ध झाली तर बांधकाम व्यवसाय तेजीत येईल. लोकांची खासगी घरे उभी राहतील. सरकारी कामासाठी वाळू उपलब्ध होईल असे निकम यांनी पटवून दिल्यानंतर प्रलंबित असलेल्या या विषयावर थोरात यांनी मार्ग काढत हातपाटी आणि डुबीने उपसा होणार्‍या वाळूचे प्रतिब्रास 3017 रुपये असे दर निश्‍चित केले आहे. रॉयल्टी आणि इतर करासहित प्रति ब्रास 3 हजार 700 रुपये प्रमाणे ग्राहकांना वाळू मिळणार आहे.

हेही वाचा-कोकणात या एकशे नऊ गावांच्या दोनशे बत्तीस वाड्यांनी गणेशउत्सवासाठी घेतला हा मोठा निर्णय


रत्नागिरी जिल्ह्यात हातपाटीने वाळू उपसा करण्यासाठी आरक्षित असलेल्या वाळू गटाचे लिलाव एक सप्टेंबरपूर्वी करण्याची मागणी महसूलमंत्र्यांनी मान्य केली आहे. एक सप्टेंबरपूर्वी गोवळकोटसह सर्वच गटाचे लिलाव जाहीर होतील. हातपाटी आणि डुबीच्या वाळूसाठी प्रतिब्रास तीन हजार रुपये दर निश्‍चित झाला आहे. ड्रेझरच्या वाळूचा दरही लवकरच निश्‍चित होईल. 

शेखर निकम , आमदार चिपळूण - संगमेश्‍वर

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top