कणकवलीत कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट  सेंटर उद्यापासून सुरू : वैभव नाईक

तुषार सावंत
Monday, 10 August 2020

 कणकवली मधील नागरिकांना कोविड टेस्ट साठी दूरवर जावे लागणार नाही..

 कणकवली (सिंधुदुर्ग) : तालुक्यात मंगळवार (11ऑगस्ट)  पासून रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील विश्रामगृहामध्ये अँटीजेन टेस्ट किटद्वारे कोविड१९ टेस्ट केली जाणार असून अर्ध्या तासात स्वॅब रिपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे कणकवलीतील नागरीकांना सोयीचे होणार आहे.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

 कणकवली तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता. तसेच कणकवली मधील नागरिकांना कोविड टेस्ट साठी दूरवर जावे लागू नये यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांच्याकडे कणकवलीत कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट  सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती.त्यानुसार पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक  यांनी जिल्हा शल्य चिकित्सक श्री. चाकूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी श्री खलिफे यांच्याशी संपर्क साधून  रॅपिड टेस्ट किट व टेक्निशियन उपलब्ध करून कणकवलीत अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार कणकवलीमध्ये उद्यापासून रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा- ठाकरे सरकार या महिन्यापर्यंत कोसळणार -

कणकवली तालुक्यात कोरोनाचा होणार फैलाव पाहता कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची, तसेच मुंबई व इतर भागातून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळत असल्यास त्यांची कोविड१९ टेस्ट या रॅपिड अँटीजेन टेस्ट किट द्वारे केली जाणार आहे.अर्ध्या तासात याचा रिपोर्ट  मिळणार आहे. कणकवली शहर आणि परिसरात साथरोग फैलाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे अनेक भागांमध्ये कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत.

हेही वाचा- रत्नागिरीत  24 तासात कोविड रुग्णालय सुरू -

जिल्ह्याचे प्रवेशद्वारही कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे असून कोल्हापूर वरून जिल्ह्यात येण्यासाठी फोंडाघाट हा जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक  तालुक्यातून होत असते परिणामी येथे रुग्णांसाठी प्रभावी सोय आणि अंमलबजावणी आवश्यक होती या पार्श्वभूमीवर कोवीड टेस्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मुळात कोरोनाव्हायरस चा पहिला रुग्ण हा कणकवली तालुक्‍यात होता त्यानंतर सातत्याने या तालुक्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे भीतीचे वातावरण होते आगामी गणेशोत्सव लक्षात घेता अशा पद्धतीने तात्काळ निदान झाल्यास नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla vaibhav naik information Covid Rapid Antigen Test Center in Kankavli starting from tomorrow