esakal | मालवण किल्ला मंदिराची पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Vaibhav Naik inspected Malvan Fort Temple

यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करून घेण्याबरोबरच आवश्‍यक सूचना त्यांनी केल्या. 

मालवण किल्ला मंदिराची पाहणी

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - देशातील एकमेव असलेल्या येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराजेश्‍वर मंदिराच्या दुरुस्तीचे व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काल (ता.20) आमदार वैभव नाईक यांनी मंदिरात भेट देत दर्शन घेतले तसेच सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करून घेण्याबरोबरच आवश्‍यक सूचना त्यांनी केल्या. 

शिवराजेश्‍वर मंदिर दुरुस्ती व नूतनीकरणासाठी आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत 1 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, बाळू नाटेकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, मंगेश सावंत, पंकज सादये, उमेश मांजरेकर, भाई कासवकर, किसन मांजरेकर, अक्षय भोसले आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

loading image