गरज असेल तिथे मी उभा राहीन, मी तुमचाच आहे ; आमदारांनी दिला जनतेला शब्द

MLA vaibhav nikam said i am with you for mahavikas aghadi in sindhudurg
MLA vaibhav nikam said i am with you for mahavikas aghadi in sindhudurg

चिपळूण (रत्नागिरी) : पालिकेतील महाविकास आघाडीला जिथे गरज असेल, तिथे मी उभा राहीन. मी तुमचाच आहे, असा शब्द चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला दिला. आमदार निकम हेही आता महाविकास आघाडीबरोबर असल्याने महाविकास आघाडीला आणखी बळ 
मिळाले आहे.

चिपळूण पालिकेत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय वाद सुरू आहे. भाजपच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारींमध्ये १९ कामांच्या चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या तक्रारीची दखल घेऊन त्या १९ कामाबाबत चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नेमली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा निकाल महाविकास आघाडीला समाधानकारक वाटला नाही, म्हणून काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिंदे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्याबाबत तक्रार केली. नगराध्यक्षांच्या विरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळावे, यासाठी महाविकास आघाडीने आमदार शेखर निकम यांच्याकडे वेळ मागितली होती.

त्यानुसार पाग येथील कन्या शाळेत आमदार निकम आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे गटनेते बिलाल पालकर आणि काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे यांनी भाजप आणि नगराध्यक्षांच्या विरोधातील तक्रारीची परिपूर्ण माहिती दिली. 

मी तुमचाच आहे..

दरम्यान, या बैठकीत नगराध्यक्षांच्या विरोधात महाविकास आघाडीने जी मोहीम सुरू केली, त्या मोहिमेला आमदार निकम यांनी सहकार्य करावे, अशी मागणी सुधीर शिंदे व इतर नगरसेवकांनी केली. त्यावर आमदार निकम यांनी मी तुमचाच आहे, मला ज्या ठिकाणी बोलवाल, तिथे मी तुमच्यासोबत असेन, असा शब्द दिला.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com