

MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
Sakal
पाली : सुधागड तालुक्यातील नागरिक महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या कारभाराने पुरते हैराण झाले असून, या विरोधात महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढत्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, या स्मार्ट मीटरची प्रक्रिया कायमची बंद करण्याच्या मागणीसाठी मनसेने सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 29) महावितरणच्या पाली विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे, येत्या सात दिवसांत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया न थांबल्यास सुधागड मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.