मोबाईल तथा स्मार्टफोन आपल्याला स्मार्ट बनवू शकतो का? होय बनवू शकतो...तो गरजेचा आहे का? होय, गरजेचाही आहे...तो उद्धार करू शकतो का? होय, करू शकतो. अनेक कलाकार मुलं म्हणतात, आम्ही कुठेच क्लास केला नाही...मोबाईलवर बघून बघून शिकलो...! ही त्या मोबाईलची सकारात्मकता ठरू शकते; पण प्रश्न तेव्हाच निर्माण होतो जेव्हा असे काहीही निष्पन्न न होता तासन्तास जेव्हा नुसता टाईमपास होत राहतो तेव्हा ती आपली अधोगती असते...कारण, त्या वेळी आपली निसर्गदत्त प्रतिभा, क्रियाशीलता निष्प्रभ होते. मोबाईलच्या व्यसनातून सुटका शक्य आहे का? होय, शक्य आहे. कसे ते पाहू.
- डॉ. राजन साखरपेकर, मिरजोळी, चिपळूण