

Migratory Navrang Bird Spotted in Konkan; Nesting Season Begins
esakal
राजापूर: मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करणारा नवरंग पक्षी कोकणात दाखल झाला असून, यंदा मॉन्सून लवकर येण्याच्या शक्यतेला त्यातून दुजोरा मिळत आहे. हवामानातील बदलांमुळे वेधशाळेचे अंदाज चुकत असताना 'नवरंग' पक्ष्याचे आगमन हा निसर्गाचा खात्रिशीर संकेत मानला जात आहे.गेल्या काही वर्षांत मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळापत्रकात सातत्याने बदल होत असल्याने हवामान अंदाजही अनेकदा चुकीचे ठरत आहेत.अशा परिस्थितीत मॉन्सूनची चाहूल देणारा नवरंग पक्षी कोकणात दाखल झाला आहे.