चिपळूण : यंदाच्या पावसाळ्यात (Chiplun Rain) तब्बल १८ दिवस धोक्याचे असून, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत १९ वेळा महाकाय अर्थात् साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येऊन समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास चिपळूण शहरात महापूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.