रत्नागिरी सापडले आणखी 23 कोरोना बाधित

राजेश शेळके
Monday, 10 August 2020

शहरात 12 रुग्ण; एकूण बाधित 2 हजार 213 च्या वर

रत्नागिरी : शहर आणि परिसरात कोरोनाचा वेगाने फैलाव आहे. काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात नव्याने 23 रुग्ण सापडले आहेत. यातील 12 रुग्ण एकट्या रत्नागिरी शहरातील आहेत. यात थिबापॅलेस आणि शिवाजी नगर परिसरात प्रत्येकी 3-3 रुग्णांचा समावेस आहे.

जिल्ह्यासह रत्नागिरीत कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या आता 2 हजार 213 च्या वर पोचली आहे. बाधितांच्या संख्येसह कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या देखील 78 झाली आहे.
काल रात्री तालुक्यात नव्याने 23 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 23 रुग्णांपैकी एकट्या रत्नागिरी शहरात 12 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यात थिबापॅलेस परिसरात पुन्हा तीन रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा- शिवसेनेवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, -

मागील काही दिवसांपासून थिबापॅलेस परिसरात कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या परिसरात आतापर्यंत 20 रुग्ण झाले आहेत. याशिवाय शिवाजी नगर येथे 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच फगर वठार, मारुती मंदिर, जोशी पाळंद, सन्मित्र नगर, कोकण नगर, माळनाका आणि जेल रोड या भागात रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात हातखंबा, कारवांची वाडी, कर्ला, वांद्री तील 2 (एडमिट), निवळी, गणेश कॉलनी टीआरपी आणि कापसाळ (ता. चिपळूण) (अ‍ॅडमिट), गुहागर (अ‍ॅडमिट), हर्णे (अ‍ॅडमिट), येथे नवे रुग्ण सापडले आहेत.
 

हेही वाचा-कर्नाटक सरकार विरोधात कोकणात शिवप्रेमींतर्फे जोरदार घोषणाबाजी -

इतर आजारावरील उपचारासाठी मिळेणात डॉक्टर

रत्नागिरी शहरासह तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी आहे. यापूर्वी कोरोना बाधितांना मुंबई, पुण्याचा प्रवासाचा इतिहास होता. परंतु आता स्थानिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यात जिल्हा कोविड रुग्णालयातील कोविड योद्धा डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी मोठ्या संख्येने बाधित होत आहे. या भीतीने खासगी रुग्णालये बंद असल्याने इतर आजारावर रुग्णांना डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र शहरात आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more 23 coronaviras patient found in ratnagiri total count 2213