सिंधुदुर्गात बुधवारची सकाळ चार कोरोना बाधित रुग्णांनी...

 विनोद दळवी 
Wednesday, 22 July 2020

3 नमुने फेर तपासणीसाठी पाठवले आहेत. तर 2 पेंडिंग आहेत.

ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गात आणखी चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी हे अहवाल प्राप्त झाले. 

हेही वाचा-शिक्षकांच्या बदल्या निश्चित, सिंधुदुर्गातील संख्या अशी... -

जिल्ह्यातील आणखी 4 व्यक्तिंचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या 73 नमुन्यांपैकी 4 पॉजिटिव्ह आणि 64 निगेटीव्ह आले आहेत. 3 नमुने फेर तपासणीसाठी पाठवले आहेत. तर 2 पेंडिंग आहेत.

हेही वाचा- शिवसैनिकांनो, काॅरंटाईन व्हा! असे का म्हणाले कणकवलीचे नगराध्यक्ष? -

 सिंधुदुर्गनगरीत कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या २८३ झाली आहे.  नव्याने दोन व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आले. परिणामी जिल्ह्यात आजपर्यंत २४० बाधित बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more 4 corona patient found in sindhudurg number of corona infected 283