रत्नागिरीत आणखी ८ जणांना कोरोनाची बाधा....

राजेश कळंबटे
Tuesday, 21 July 2020

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 1300 चा टप्पा पार केला आहे.

रत्नागिरी : मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालात एकूण 8 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात कळंबणी येथील 1, कामथे येथील 7 जणांचा समावेश आहे. नव्याने 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 1300 चा टप्पा पार केला आहे. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या रत्नागिरीकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

 

दरम्यान रत्नागिरीतील आणखी एका रुग्णाची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर  जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1308 झाली आहे.

हेही वाचा- दोडामार्गात चाकरमान्यांबाबत खबरदारी, आयटीआयचे केले... -

 

सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत 37 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यात रत्नागिरी 20,  कामथे  17 यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या  1300  इतकी झाली आहे. 

हेही वाचा-भयंकर! भरचौकात स्वतःच्यात गळ्यावर ब्लेडने केले सपासप वार -

उपचारादरम्यान साक्री नाटे तालुका रत्नागिरी येथील एका 67 वर्षीय रुग्णाचा काल मृत्यू झाला त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे यामुळे मृत्यूची संख्या आता 42 झाली आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more 8 corona patient found in ratnagiri number of positive patients has gone up to 1299