खेडेकर कुटुंब काँग्रेसचे (Congress) माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांचे नातेवाईक होते. या अपघातानंतर कुंभार्ली गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चिपळूण : पुण्याहून चिपळूणकडे येणारी मोटार कुंभार्ली घाटात (Kumbharli Ghat Car Accident) सुमारे चारशे फूट दरीत कोसळून कुंभार्ली येथील माय-लेकरू जागीच ठार झाले. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास घडली. ते दोघेही घरी न आल्याने शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.