VIDEO : सिंहावरुन सवारी केल्याचा फिल देणारी मोटारसायकल

A motorcycle Giving Fill Of Riding On a Lion Sindhudurg Marathi News
A motorcycle Giving Fill Of Riding On a Lion Sindhudurg Marathi News

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - तालुक्यातील म्हापण गावामध्ये पुंडलिक केळुस्कर या युवकाने अनोख्या पद्धतीने आपली जुनी मोटरसायकल मॉडीफाय केली. या मोटारसायकलला त्याने फायबरच्या मदतीने सिंहाचा लुक दिला आहे. यामुळे या मोटारीला सिहांचा फिल आला आहे. 

पुंडलिक केळुस्कर असे अनोखी मोटारसायकल साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन ते करत असतात. राज्यस्तरिय स्पर्धेमध्ये देखील सहभाग घेत असतात. गणेशोत्सवात डेकोरेशनसाठी त्यांना विशेष बोलवण्यातही येते. पण काहीतरी वेगळं करावं म्हणून आपल्या जुन्या मोटरसायकलवर सिंहासारखा दिसणारा फायबर कवच त्यांनी तयार केला आहे. हा कवच बसवल्यानंतर जणू काय गाडी चालवताना सिंहावर बसल्यासारखा फील येतोय. सध्या ही मोटारसायकल वेंगुर्ले परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. केळुस्कर यांचे या कलेमुळे काैतुकही होत आहे.

पर्यटक, ग्राहकांनाही याचे आकर्षण

केळुस्कर याचे म्हापण गावांमध्ये छोटेसे हॉटेल आहे. त्याच हॉटेलच्या बाजूला त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल असा पद्धतीने मोटरसायकल उभी करून ठेवली आहे. तिथे येणारे पर्यटक तसेच ग्राहक या मोटारसायकलसोबत छायाचित्रे काढतात. 

अंदाजे ५५ ते ६० हजार रुपये खर्च

ही बाईक तयार करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. प्रथम सिंहाच्या आकाराचा मातीचा साचा तयार केला. त्यामध्ये फायबर ओतून ही सिंहाची प्रतिकृती तयार केली. ती बाईकवर बसवली. या प्रतिकृतीचे वजन २८ किलो आहे. हे तयार करण्यासाठी अंदाजे ५५ ते ६० हजार रुपये खर्च आला. 

-  पुंडलिक केळुस्कर ( कलाकार)

काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूनेच साकारले

दरवर्षी आम्ही गणेशोत्सवात विविध प्रकारचे डेकोरेशन करत असतो. यातूनच काहीतरी वेगळे करावे, या उद्देशाने भावाने हे डिझाईन साकारले आहे. त्याचे काैतुक सर्वत्र होत आहे. हे तयार करण्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकष्टा केली.  

- नाना केळुसकर (भाऊ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com