
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर कमी असतानाही त्याहून चार पटीने यावर कर आकारून याची विक्री केंद्र सरकार करत असून काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीततील दरापेक्षा आता तिप्पटीने हे दर वाढवून नागरिकांची गळचेपी करत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना देखील याचा फटका बसत आहे. यामुळे कॉंग्रेसच्यावतीने आज नागरिकांना साखर, तिळगुळ व तीळ लाडू वाटप करून भाजप सरकारचा निषेध केला.
सध्याच्या कोविड 19च्या कोरोनाच्या काळात आधीच दैनंदिन जीवन मेटाकुटीला आले असताना देखील केंद्र सरकार मात्र इंधनावरील दर वाढवत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर कमी असतानाही त्याहून चार पटीने यावर कर आकारून याची विक्री केंद्र सरकार करत असून काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीततील दरापेक्षा आता तिप्पटीने हे दर वाढवून नागरिकांची गळचेपी करत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सदस्या विभावरी सुकी, जिल्हा चिटणीस बाळू अंधारी, मालवण कुडाळ विधानसभा कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार तथा जिल्हा युवक कॉंग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र म्हापसेकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, माया चिटणीस, युवक विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी, संदीप सुकी, चंदन पांगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नुतन सावंत, गीता सावंत, विधानसभा मिडीया प्रमुख जासमीन लकमेक्षवर, फिझा मकानदार, उमेश सावंत, बाळा नमशी, सुधीर मल्हार आदी उपस्थित होते.
जनतेचा भ्रमनिरास
"अच्छे दिन' सांगून केंद्र सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून आज जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कार्यकार्त्यांनी भाजप सरकारचा साखर, तिळगुळ वाटून गांधीगिरी मार्गाने निषेध केला.
संपादन - राहुल पाटील