निलेशचा पराभव नारायण राणे यांना अमान्य 

अनंत पाताडे
शुक्रवार, 24 मे 2019

कुडाळ - रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निलेश राणे यांचा झालेला पराभव मला मान्य नाही. निकाल पाहिल्यावर संशयाला जागा निर्माण झाली. तसेच दोन राऊंड गेल्यानंतर प्रत्येक फेरीत सात ते आठ हजाराचा फरक होता ही मला हेराफेरी वाटते, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.  

पडवे येथील मेडिकल काॅलजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री. राणे बोलत होते. श्री. राणे म्हणाले, कणकवली मतदार संघात आमचा आमदार असूनही कमी मते पडली. हा निकाल पाहिल्यानंतर संशयाला जागा राहाते. एकूण 24 फेऱ्या होत्या. सगळ्याच फेऱ्यामध्ये सात ते आठ हजारांचा फरक कसा असू शकतो. दुसरीकडे चिपळूण, रत्नागिरी मतदार संघात कोणतेही काम नाही. खासदार कधी लोकांनी पाहिला नाही, तरी तिथे एका एका ठिकाणी ५७ हजार, ५९ हजारांचे लिड कसे मिळते. इतकी मते कशी पडतात?  यावरून हा जो निकाल आहे त्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. नैतिकदृष्ट्या आमचा उमेदवार पराभूत झालेला नाही. प्रत्यक्ष निवडणूकीत जरी पराभव झालेला असला तरी हा पराभव आम्हाला मान्य नाही, असे श्री. राणे म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane comment