शिवसेनेवर टीका करताना नारायण राणे म्हणाले,

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

विजयदुर्ग किल्याच्या ढासळलेल्या भागाची पाहणी करण्याच्या निमित्ताने खासदार राणे विजयदुर्गला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेची दुटप्पी भुमिका आहे. पैसे कमावणे हा शिवसेनेचा धंदा असल्याची खरमरीत टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी विजयदुर्ग येथे केली. रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेसोबत आपण असू असेही त्यांनी सांगून प्रकल्पाला समर्थन असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. 

विजयदुर्ग किल्याच्या ढासळलेल्या भागाची पाहणी करण्याच्या निमित्ताने खासदार राणे विजयदुर्गला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, सभापती सुनील पारकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, आरिफ बगदादी, संदीप साटम, उत्तम बिर्जे, मुफीद बगदादी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, ""रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना सुरुवातीला विरोध करीत होती. आता त्यांची नेतेमंडळी प्रकल्पाबाबत सकारात्मक होत आहेत. ही शिवसेना पक्षाची दुटप्पी भूमिका आहे. त्यांच्या बोलण्यात बदल होत चालला आहे. त्यांच्याकडून घूमजाव सुरू आहे. प्रकल्पासाठी आपण स्थानिक जनतेसोबत आहे. जनता ज्या दिशेने जाईल, त्याप्रमाणे जाणार आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane Comment On Shivsena Sindhudurg Marathi News