जानकर यांनी पाच माशांची नावे तरी सांगावीत - नितेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

सावंतवाडी - मंत्रिमंडळामध्ये मंत्री नेमणूक करताना त्यांना त्या खात्याची माहिती आहे का नाही याची खातरजमा करावी. कोणालाही उठवायचे आणि खात्याचा मंत्री करायचे हे योग्य नाही, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी विधानसभा अधिवेशनात केली. तसेच  मत्स्यव्यवसाय खात्याचा मंत्री म्हणून महादेव जानकरांची पात्रता नसल्याचे सांगत त्यांनी किमान पाच प्रकारच्या माशांची नावे सांगावीत, असे आव्हान श्री राणे यांनी केले. 

श्री. राणे म्हणाले, मच्छिमारांचे प्रश्न सुटत नाहीत. एलईडी लाईट लावून होत असलेले फिशिंग बंद होत नाही. परप्रांतिय मच्छिमार मासेमारीसाठी येतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. अशी स्थिती आज आहे. मंत्री जाणकर यांना काहीच माहिती नाही. असे मंत्री नेमल्याने नेमके न्याय मागायचे कुणाकडे? आणि अशाने आमच्या मच्छिबांधवांना न्याय मिळणार कसा? असा सवालही त्यांनी विधिमंडळात केला. 

 श्री जाणकर काल सिंधुदुर्गमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व श्री राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. श्री. जाणकर म्हणाले, मी शहरातला नाही खेडेगावातील आहे. आमच्या गावा शेजारच्या धरणात आम्ही मच्छिमारी केली आहे. मी इंजिनिअर आहे. मला 97 टक्के मार्क मिळालेत. 3 टक्के मार्क मिळाले असते तर देशात पहिला आलो असतो. 

श्री. जाणकर म्हणाले, मी मत्स्यव्यवसाय मंत्री झाल्यानंतर कोचीन येथे सात दिवस प्रशिक्षणासाठी गेलो होतो. तेथे सागरी माशांबद्दल माहिती घेतली आहे. माशांबद्दल आणखी माहिती हवी असेल तर नितेश राणे यांचा सल्ला जरुर घेईन, असा टोला श्री. जानकर यांनी लगावला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mp Nitesh Rane comment