"नाणार'समर्थक शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना जोड्याने मारा" ; रिफायनरी वाद पेटला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

नाणार रिफायनरी जाणार असल्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला आहे. त्यामुळे नाणारचा विषय कधीच संपलेला आहे. नाणारचे समर्थन करणाऱ्या काजव्यांची यापूर्वीच हकालपट्टी केलेली आहे. तरीही, पक्षविरोधी भूमिका घेत नाणारचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिक वा सेना पदाधिकाऱ्यांना जोड्याने मारा, असे खासदार विनायक राऊत जाहीर सभेत म्हणाले. 

राजापूर - नाणार रिफायनरी जाणार असल्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला आहे. त्यामुळे नाणारचा विषय कधीच संपलेला आहे. नाणारचे समर्थन करणाऱ्या काजव्यांची यापूर्वीच हकालपट्टी केलेली आहे. तरीही, पक्षविरोधी भूमिका घेत नाणारचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिक वा सेना पदाधिकाऱ्यांना जोड्याने मारा, असे खासदार विनायक राऊत जाहीर सभेत म्हणाले. 

हे पण वाचा -  एसटीत तिकिट काढताना जुळवली दोनशे स्थळे 

"नाणार'वरून शिवसेनेमध्ये दुफळी माजलेली असताना आज रिफायनरीच्या विरोधात सागवे येथे शिवसेनेच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. ते म्हणाले, ""प्रदूषणकारी नाणार राजापुरात नको, तो रायगडात न्यावा. कोकण म्हणजे कुणीही यावे अन्‌ कुणीही लुटावे, अशी धर्मादाय भूमी नाही. स्थानिक लोकांना रिफायनरी प्रकल्प नको असून तो गुजराती लोकांसह जमीन दलालांना हवा आहे. कोकणच्या मुळावर येणाऱ्यांचा सत्यानाश होईल. नाणारला गाडलं असून भविष्यामध्ये आयलॉगही गाडू. रोजगारनिर्मितीसाठी कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समितीने प्रयत्न केल्यास त्याला आमची साथ राहील.'' 

हे पण वाचा - तेहरानमधील त्या भाविकांच्या सुटकेसाठी खा. मंडलिकांचे प्रयत्न

मंत्री उदय सामंत म्हणाले, ""नाणार होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे. भाजपसोबत सत्तेमध्ये असतानाही सेनेने नाणारबाबतचा निर्णय बदललेला नाही. त्यामुळे नाणारचा विषय आता संपला आहे. स्वतःची एक गुंठा जमीन मंदिर बांधकामासाठी न देणाऱ्यांनी शेतकऱ्यांना आपल्या जागा रिफायनरीला देण्याचा सल्ला देऊ नये. जमिनी खरेदी करणारे सर्व अमराठी कोकणामध्ये कसे आले, याची चौकशी करणे गरजेचे आहे. समर्थकांचे पितळ आता उघडे करण्याची वेळ आली असून मेळाव्याच्या गर्दीने समर्थकांनी वेळीच शहाणे व्हावे. विकासासह येथील युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. कोणी कितीही प्रयत्न केले तरी प्रकल्पाबाबत कोणतेही गैरसमज वा प्रकल्पाबाबतच्या भूमिकेमध्ये बदल होणार नाहीत.'' 

अशोक वालमांचा "नाणार हटाव'चा नारा 
आमदार साळवी यांनी आजपर्यंत नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेने कशी आणि कोणती भूमिका घेतली, प्रकल्पाला कसा विरोध केला, स्थानिक पातळीवर कशी आंदोलने झाली अन्‌ प्रकल्प कसा रद्द झाला, आदींचा आढावा घेतला. कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनीही नाणार हटावचा नारा दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp vinayak raut angry on nanar refinery project