Pali News : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

महावितरणच्या अधिकाऱ्याला रस्त्यात अडवून, त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून 'हात-पाय तोडण्याची' आणि 'जिवे मारण्याची' धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
Crime

Crime

sakal

Updated on

पाली - स्मार्ट मीटर बसवल्याच्या कारणावरून महावितरणच्या अधिकाऱ्याला रस्त्यात अडवून, त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून 'हात-पाय तोडण्याची' आणि 'जिवे मारण्याची' धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सुधागड तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बालाजी प्रल्हादराव चात्रे यांच्या तक्रारीवरून पाली पोलिसांनी पेडली येथील राम मारुती पवार आणि दिनेश राम पवार या पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com