
रत्नागिरी : महावितरण कंपनीच्या स्मार्ट अर्थात् टीओडी (टाईन ऑफ डे) मीटरची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील फॉल्टी मीटरचा विषय पुढे आला आहे. महावितरणने केलेल्या सर्व्हेमध्ये ४० हजार मीटर फॉल्टी (दोष असलेले) आहेत. हे सर्व मीटर बदलून तिथे नवीन टीओडी मीटर बसवण्यात येणार आहेत; परंतु हे मीटर सध्यातरी पोस्टपेड किंवा प्रीपेड नाहीत. नियमित मीटरप्रमाणे वीज बिल देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अदानी कंपनीने १२ हजार ५२८ मीटर बसवल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली.