कोकणात एसटी नियोजनाचा अभाव : जाताना भरून गेलेल्या गाड्या येतांना रिकाम्याच..

गोविंद राठोड
शनिवार, 23 मे 2020

परप्रांतीय मजुरांना सोडण्यासठी आज रत्नागिरी जिल्ह्यातून 16 बस गाड्या पनवेल ला गेल्या आहेत.

 खेड  (रत्नागिरी) : परप्रांतीय मजुरांना सोडण्यासठी आज रत्नागिरी जिल्ह्यातून 16 बस गाड्या पनवेल ला गेल्या आहेत.जिल्ह्यातील या गाड्या परत येताना मात्र अक्षरशः रिकाम्या येणार आहेत. जर योग्य नियोजन केले असते तर या गाड्यातून अनेक चाकरमानी कोकणात येवू शकले असते.  

   रत्नागिरी,राजापूर,लांजा,चिपळुण,गुहागर,खेड,दापोली तालुक्यातून एकूण 306 मजुर आज पनवेल ला रवाना झाले. तेथून ते ओडिशा राज्यात जाणार आहेत. कोकणातील चाकरमानी कोकणात येण्यासाठी पायी प्रवास करून जीव धोक्यात घालून येत असतांना जिल्ह्यातील या गाड्या परत येताना मात्र अक्षरशः रिकाम्या येणार आहेत. जर योग्य नियोजन केले असते तर या गाड्यातून अनेक चाकरमानी कोकणात येवू शकले असते.

प्रशासकीय नियोजनाचा अभाव व समन्वय नसल्याने परत येतांना ह्या गाड्या रिकाम्या धावत आहेत. संपुर्ण लॉक डाऊनच्या काळात तर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांना परेल,कुर्ला,ठाणे येथील आगारात पुरेसे मनुष्यबळ व बसेस कमी असल्यानेमुळे रिकाम्या बस गाड्या घेऊन वरील आगारात पाठवण्यात आले होते. या बस मधून परप्रांतीय प्रवासी घेवून गुजरात,मध्यप्रदेश,राजस्थानच्या सीमारेषेपर्यंत सोडण्यात आले. आणि तेथून पुन्हा कोकणात या गाड्या रिकाम्याच आल्या. परंतू जर त्यावेळी नियोजन केले असते तर मुंबईतून चाकरमान्याना घेवून या गाड्या कोकणात आल्या असत्या. याचे नियोजन कोण करणार? कोणीही नाही.

या पद्धतीने चिपळूण,गुहागर,देवरूख आणि रत्नागिरी आगारातून अनेक गाड्या मुंबई व अन्य राज्याच्या सीमा रेषेपर्यंत जावून आल्या. रत्नागिरी आगारातून जर परतीच्या गाड्यामध्ये कोकणातील चाकरमान्याना आणण्याचे नियोजन केले गेले असते तर अनेक गरजू चाकरमानी कोकणात आले असते. पण येथील अधिकार्‍यांनी ही बाब वरिष्ठापर्यंत तसेच लोकप्रतिनिधींना निदर्शनास आणून दिलीच नाही त्यामुळे महामंडळाच्या अनेक बस गाड्या मुंबईतून रिकाम्या आणाव्या लागल्या आहेत.      
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Msrt not planning in kokan.return bus empty