mucormycosis
mucormycosise sakal

सिंधुदुर्गात म्युकर मायकोसिसचा रुग्ण; आरोग्य यंत्रणेत खळबळ

रुग्ण कुडाळ तालुक्यातील; जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ
Published on

ओरोस : सिंधूदुर्ग जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा (mucer mycosis patient) रुग्ण सापडला आहे. कोरोनानंतर (covid-19) त्यांना हा साथरोग झाला असून सध्या कोल्हापुर येथील सीपीआर (kolhapur CPR hospital) रुग्णालयात तो उपचार घेत आहे, तर दूसरा रुग्ण संशयीत असून तो मुंबई (mumbai) येथे उपचार घेत आहे. त्यांच्यावर म्युकर मायकोसिसचे उपचार सुरु आहेत. बाधित रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील आहे तर संशयीत रुग्ण देवगड तालुक्यातील आहे. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली व पंजाब या राज्यात म्युकर मायकोसिस साथरोगाने थैमान घातले आहे. केंद्राने या आजाराला साथरोग म्हणून जाहीर करण्याचे आवाहन राज्यांना केले आहे. हा आजार झालेल्या रुग्णाची फुफ्फुसे, किडनी आणि डोळे या अवयवांवर विपरीत परिणाम होवून मृत्युचा धोका जास्त असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या आजाराची भीती जनतेत आहे.

mucormycosis
बेस्ट गुरुजी! 2 शिक्षकांनी केला धनगरवाड्यावरच्या शाळेचा कायापालट

मे महिण्यात जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे अनेक संशयित रुग्ण मिळाले होते. मात्र, त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. परंतु जिल्ह्यात आता म्युकर मायकोसिसचा शिरकाव झाला आहे. कोरोना आजारावर मात केल्यानंतर कुडाळ तालुक्यातील एका रुग्णाला हा आजार झाला आहे. कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर देवगड येथील एकावर म्युकर मायकोसिसचा उपचार सुरु आहे. परंतु ते संशयीत असून त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली नाही.

"जिल्ह्यात एक म्युकर मायकोसिस रुग्ण मिळाला आहे. दुसरा संशयीत आहे. या रुग्णावर एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन दिले जाते. जिल्हा रुग्णालयात सध्या ४० इंजेक्शन उपलब्ध आहेत. एका रुग्णाला ही सहा इंजेक्शन द्यावी लागतात. त्यामुळे सध्या म्युकर मायकोसिसच्या सहा रुग्णावर उपचार करता येतील, एवढी इंजेक्शन उपलब्ध आहेत."

- डॉ. अनिशा दळवी, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद

mucormycosis
पोल्ट्रीची भिंत कोसळल्याने नांगनूरचे 3 जण जागीच ठार; गडहिंग्लजमधील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com