
शेण मागं पडायचं मुख्य कारण मुळातलं घटतं पशुधन हे नाकारून कसं चालेल? वाढतं यांत्रिकीकरण हेही कारण आहेच; पण प्रश्नांची उत्तरं तत्कालिक फायद्याचाच जास्त विचार करून मांडली जातायत. बागेत गुरं फिरत होती तेव्हा करपेल तरी एवढं बोकाळत नव्हतं. टाळटुळ अर्धेअधिक गुरं संपवत होती. बागा साफ राहात होत्या. तरीही गवत वाढलंच तरी ते गुरांना हवंच होतं. घरात दुधदुभतं होतं. अगदी गावठी कोकण गीड्डाही बाजारी खाण्यांशिवाय पुरेसं दुध देत होत्या. दुधाची पिशवी ही संस्कृती नव्हती. गोबरगॅस होते. भाजावळीला, चुलीला शेण्या होत्या. आतातर स्लरीपासून गांडूळखत, जीवामृतही करता येतंय. परत खत झाडामाडांनाही होतंच. भाजावळीला गुरांच्या पायाखालचं गोखरेण (गोखूर खत) किती उपयोगी..पण शॉर्टकटच्या नादात आपण ही साखळी तोडली.
- जयंत फडके, जांभूळआड पूर्णगड, रत्नागिरी