Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी ‘चक्का जाम’; हुमरमळ्यात आंदोलन, ठाकरे शिवसेना आक्रमक
Mumbai-Goa Highway Blocked: मुंबई-गोवा महामार्गाचे अकरा वर्षांपूर्वी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले; पण अजूनही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. प्रत्येक गणेश चतुर्थीला महामार्गाची मंत्री पाहणी करून कामे पूर्ण होण्याची डेडलाईन देण्यात येते. यावर्षीसुध्दा तसेच सांगण्यात आले.
Thackeray Sena activists blocking Mumbai-Goa Highway at Humarmala during chakka jam protest demanding urgent repairs.Sakal
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला, तरी बांधकाम विभागाने दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरे शिवसेनेतर्फे आज तालुक्यातील हुमरमळा येथे भरपावसात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.