Mumbai-Goa Highway : पुढील 6 महिन्यांत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार! गणेशोत्सवाआधी 'हा' महत्त्वाचा पूल प्रवाशांच्या सेवेत; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा

Chiplun Flyover to Open Before Ganeshotsav : मुंबई-गोवा महामार्गावरील पाच उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. चिपळूणचा उड्डाणपूल गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे नियोजन असून, उर्वरित महामार्गाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
Chiplun Flyover Latest Update

Chiplun Flyover Latest Update

esakal

Updated on

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पाच उड्डाणपूल पूर्णक्षमतेने वाहतुकीसाठी खुले केले आहेत. दीर्घकाळापासून रखडलेला आणि महत्त्वाचा असलेला चिपळूण येथील उड्डाणपूल गणेशोत्सवापूर्वी प्रवाशांच्या सेवेत पूर्णपणे दाखल केला जाणार (Chiplun flyover Mumbai Goa Highway latest update) आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. याशिवाय महामार्गाचे उर्वरित कामही अत्यंत वेगाने सुरू असून, पुढील सहा महिन्यांत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com