

Mumbai Goa Highway Traffic Rules Change For Ganeshotsav Heavy Vehicles To Face Phased Ban From September 11
sakal
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी राज्य सरकारने १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या सर्व अवजड वाहनांना ११ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून बंदी घातली आहे. टप्प्याटप्प्याने ही बंदी लागू केली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिवहन विभागाने आदेश जारी केले आहेत.