traffic jam Mumbai to Goa highway weekend
esakal
पाली (रायगड) : महाराष्ट्र दिन आणि शुक्रवारपासून सुरू झालेली सलग उन्हाळी सुट्टी, यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि पर्यटकांचा ओघ वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर आज शुक्रवारी (ता. १) प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला (Mumbai Goa highway traffic today) मिळाली. अवघे काही किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना कित्येक तास रखडावे लागले. कडाक्याचे ऊन आणि वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे प्रवाशांचे विशेषतः लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले.