Mumbai-Goa Highway work Permission
Mumbai-Goa Highway work Permission

मुंबई-गोवा चौपदरीकरणाला परवानगी, पण काही अटी

Published on

कणकवली (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लॉकडाउनमुळे थांबविण्यात आले होते. आता लॉकडाउनची मर्यादा 30 एप्रिलपर्यंत केल्याने आणि रस्ते वाहतूक पूर्णतः थांबल्याने महामार्गाच्या ठेकेदार कंपन्यांना काम सुरू करण्यासाठी अटी-शर्तीवर परवानगी दिली जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडे ठेकेदार कंपन्यांनी संचारबंदी आणि लॉकडाउनचे नियम पाळू, असे आश्‍वासन दिल्याने बुधवारी (ता. 15) काम सुरू होणार आहे. 

देशातील कोरोना संक्रमित रुग्ण सातत्याने वाढत आहेत. यावर नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाउन वाढविले; परंतु अत्यावश्‍यक सेवा आणि शेती बागायतीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. टंचाई आणि सिंचनाच्या योजनांनाही परवानगी देण्यात आली. याच आधारे आता महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला परवानगी दिली जाणार आहे. 

ठेकेदार कंपनीला काही अटी-शर्तींवर ही कामे सुरू करावी लागणार आहेत. याप्रमाणे काही जिल्ह्याबाहेरील मजूर आणता येणार नाहीत. काम सुरू असेल तेथे 10 मजूर आणि एक पर्यवेक्षक असेल. आरोग्याच्या सर्व सुविधा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागेल. सध्या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः थांबल्याने अर्धवट स्थितीतील कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. यासाठी ठेकेदार कंपन्यांनी तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. 

अशी दक्षता घेणार 
* सोशल डिस्टस्निंग पाळणार 
* एका ठिकाणी 10 कामगार 
* मजुरांचा वैद्यकीय अहवाल ठेवणार 
* बाहेरील मजूर येणार नाहीत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com