esakal | पुन्हा मुंबई रिटर्न; सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai returns again; Another positive in Sindhudurg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 29 एप्रिलपासून गेल्या 13 दिवसांत कोरोना रुग्ण मिळाला आहे. या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्रीसुद्धा मुंबई असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

पुन्हा मुंबई रिटर्न; सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवा कोरोनाबाधित रुग्ण सोमवारी रात्री आढळून आला आहे. हा रुग्ण जिल्ह्यातील देवगड येथील असून, तो नवी मुंबई येथील वाशी येथून आला होता. आज रात्री उशिरा त्याचा कोरोना अहवाल आला आहे. पाचवा रुग्ण सापडल्याने प्रशासनात खळबळ माजली. जिल्ह्यात 29 एप्रिलपासून गेल्या 13 दिवसांत कोरोना रुग्ण मिळाला आहे. या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्रीसुद्धा मुंबई असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली. 

जिल्ह्यात 26 मार्चला पहिला कोरोना रुग्ण मिळाल्यानंतर त्याला 9 एप्रिलला घरी सोडण्यात आले होते. त्याचा दुसरा व तिसरा नमुना 3 एप्रिलला निगेटिव्ह आला होता. त्यानंतर 29 एप्रिलला सकाळपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याने जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनच्या दिशेने सुरू होती. त्या दिवशी सायंकाळी घोटगे-सोनवडे येथील 17 वर्षीय मुलगी कोरोनाबाधित आढळली होती. यानंतर 3 एप्रिलला आंबा वाहतूक करण्यास मुंबई येथे गेलेली वेंगुर्ला तालुक्‍यातील वायंगणी येथील व्यक्ती कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर पुन्हा कुडाळ तालुक्‍यातील एक व्यक्ती 7 एप्रिलला कोरोनाबाधित आढळली. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या चार झाली होती. दरम्यान, दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाला 10 एप्रिलला घरी सोडण्यात आले. तिचा दुसरा व तिसरा नमुना निगेटिव्ह आला होता. त्यामुळे दोन रुग्ण केवळ उपचार घेत होते. आज पुन्हा रुग्ण मिळाल्याने कोरोना उपचार घेणाऱ्यांची संख्या आता तीन झाली आहे. पाचव्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच प्रशासकीय यंत्रणेने त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू केला. संबंधित रुग्ण महिला असून, 51 वर्षीय आहे. दरम्यान, या रुग्णाला मुंबई ते देवगड अशी ट्रॅव्हल हिस्ट्री असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली. 

loading image