पक्ष राहीले बाजूलाच अन् कार्यकर्तेच भिडले

municipal council elections arguments between two activist sindhudurg
municipal council elections arguments between two activist sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या एका माजी नगरसेवकांला रस्त्यात अडवुन तुला उमेद‌वारी मिळणार नाही अशी शेरेबाजी केल्यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली.त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.नगरपंचायत आवराच्या बाहेरच हा प्रकार घडला.काही दिवसांपुर्वी याच कार्यकर्त्याला त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बदडले होते.

नगरपंचायत निवडणुक आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे.या हाणामारीची चर्चा सध्या बाजारपेठेत सुरू असुन पोलीसांत तक्रार होण्याची शक्यता आहे.वाभवे वैभववाडी नगरपंचायत आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरात निवडणुकीचे वारे जोरदार वाहु लागले आहेत.अनेक जणांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे प्रत्येक इच्छुक स्वतःसाठी एका प्रभागाच्या शोधात आहेत.सद्यस्थितीत बलाढ्य असलेल्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठी रस्सीखेच असुन उमेद‌वारीवरून त्यांच्यात शह कटशहाचे राजकारण सुरू आहे.

दरम्यान आज ता.५ अकरा वाजण्याच्या सुमारास एक नगरसेवक दुचाकीवरून जात असताना त्याच्याच पक्षाच्या एका ठेकेदार कार्यकर्त्याने त्याला रस्त्यातच थांबविले.आपल्या चारचाकी गाडीतुन त्या माजी नगरसेवकावर अवेहलनात्मक टिप्पणी करू लागला.आता तुला उमेद्‌वारी मिळणार नाही अशा शब्दात बोलल्यानंतर त्या नगरसेवकाने त्याची काळजी तु करू नकोस माझ मी आणि पक्षश्रेष्ठी बघुन घेऊ असे समजुतीच्या स्वरात त्याला प्रतित्युत्तर दिले.तरीदेखील मागील उणीधुणी काढुन त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू लागला.हा वाद सुरू असल्याचे पाहताच तेथे बघ्याची गर्दी झाली.नगरसेवक आणि त्यांचे अनेक कार्यकर्ते तेथे गोळा झाले.त्यांच्या जोरदार हाणामारी झाली.त्या ठेकेदार कार्यकर्त्याला चांगलेच बदडले.हा प्रकार सुरू असताना तेथे आलेल्या काहीनी त्या दोघांची समजुत काढीत त्यांना बाजुला केले.

दरम्यान या प्रकाराची सध्या बाजारपेठेत जोरदार चर्चा सुरू असुन तो माजी नगरसेवक पोलीसात तक्रार देण्याची शक्यता आहे.या प्रकारामुळे नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने बाजारपेठेतील वातावरण चांगलेच तापले आहे.प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोठी धुसफुस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये सुरू आहे.एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने राजकीय व्युहरचना करीत आहे.त्यातुनच हे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.

 काही दिवसांपुर्वी या ठेकेदार कार्यकर्ता आणि त्यांच्याच पक्षाच्या आणखी एका नगरसेवकांमध्ये नगरपंचायत आवारातच चांगली जुपंली होती.त्यावेळी त्याच्या कानशिलात लगावण्यात आली होती.या प्रकाराची आठवणी ताज्या असताना हा प्रकार घडल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.हा ठेकेदार कार्यकर्ता एका प्रभागातुन निवडणुक लढविण्यास इच्छुक आहे.पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या गळ्यातील तो ताईत बनला असल्यामुळे त्याला उमेद्‌वारी मिळणार अशी देखील चर्चा आहे.

 पाच हजार रूपयेचा सुध्दा उल्लेख,माजी नगरसेवक आणि त्या कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरू असताना पाच हजार रूपयेचा उल्लेख झाला.हा उल्लेख नेमका काय याची सुध्दा शहरात चर्चा सुरू झाली आहे.
 

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com