कुडाळ - कवठी-अन्नशांतवाडी येथील संदीप ऊर्फ बाळा दामोदर करलकर (वय ५२) याचा घरातच खून झाला. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. घरातील व्हरांड्यात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह पडलेला आढळला. हा हल्ला गुरुवारी (ता. २७) सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी खुनाचा तपास सुरू केला आहे.