Murud Crime
Murud CrimeSakal

Murud Crime : परराज्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल

Crime News : मुरुड येथे भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह आरोपींविरुद्ध अल्पवयीन मुलीवर औषध देऊन अत्याचार, वारंवार बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगच्या कारणाने गुन्हा दाखल; पोलिसांनी दोनांना अटक केली, इतर फरार.
Published on

मुरुड : परराज्यातील अल्पवयीन मुलीस फुस लावून गुंगीचे औषध देऊन लॉजवर बलात्कार करत त्याचा व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केल्या प्रकरणात खळबळ जनक बातमी हाती आली असून पोलिसांनी धाराशिव जिल्हा भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्षासह इतर दोघांना या प्रकरणात आरोपी केले आहे. यापैकी एकाला अटक केली असून भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष सह एक जण फरार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com