esakal | कोमसपा नवी पिढी घडवण्यासाठी राबणार `हा` उपक्रम; `हे` लेखक होणार सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

My School My Teacher KOMSAPA Event For New Generation

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्यावतीने शाखेच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरुन शिक्षक दिनापासून म्हणजेच 5 सप्टेंबरपासून पुढील 20 दिवस माझी शाळा माझे शिक्षक ही लेखमाला प्रकाशित होणार आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन शिक्षणाधिकारी आंबोकर यांच्या हस्ते झाले. 

कोमसपा नवी पिढी घडवण्यासाठी राबणार `हा` उपक्रम; `हे` लेखक होणार सहभागी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - शाळा म्हटली की प्रत्येकाला आपण प्रथम शिकलो ती शाळा आठवते. ते गुरुजन आठवतात. या अनुषंगाने कोकण मराठी साहित्य परिषदेने सुरू केलेला "माझी शाळा माझे शिक्षक' हा लेखमालिका उपक्रम दर्जेदार असून हा उपक्रम जिल्हा परिषद शिक्षण विभागास प्रेरणादायी ठरेल, असे कौतुकोद्‌वार जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी काढले. 

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आयोजित "माझी शाळा, माझे शिक्षक' या लेखमालिकेच्या ऑनलाईन उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्यावतीने शाखेच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरुन शिक्षक दिनापासून म्हणजेच 5 सप्टेंबरपासून पुढील 20 दिवस माझी शाळा माझे शिक्षक ही लेखमाला प्रकाशित होणार आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन शिक्षणाधिकारी आंबोकर यांच्या हस्ते झाले. 

कोमसाप मालवण ग्रुपवर हे लेख प्रकाशित झाल्यानंतर ते जिल्हा परिषद शिक्षण विभाग व महाराष्ट्रातील अन्य भागात पाठविण्यात येणार आहेत. कोमसाप सिंधुदुर्गचे अध्यक्ष मंगेश म्हस्के, कोमसाप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रुजारिओ पिंटो यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

या लेखमालेत प्रारंभी पुष्प माधव गावकर, असगणी हे गुंफणार असून ते असगणी क्रमांक 1 येथील शिक्षक लक्ष्मण शिवाजी परब यांच्यावर लिहिणार आहेत. समारोप रामचंद्र आंगणे यांच्या ओसरगाव क्रमांक 1 या शाळेतील आदर्श शिक्षिका सुनंदा गोविंद राणे यांच्यावरील लेखाने 20 सप्टेंबरला होणार आहे. या लेखमालेत मेघना जोशी, विजय चौकेकर, सुगंधा गुरव, सदानंद कांबळी, बाबू घाडीगावकर, अर्चना कोदे, कल्पना मलये, उज्ज्वला धानजी, योगेश मुणगेकर, वैजयंती करंदीकर, शिवराज सावंत, विद्यानंद परब, शीतल पोकळे, गुरुनाथ ताम्हणकर, श्रद्धा वाळके, मंदार सांबारी, विशाखा चौकेकर, भानू तळगावकर हे लेखक सहभागी झाले आहेत. 

""कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेने अनेक साहित्यिक उपक्रम राबविले; पण माझी शाळा ! माझे शिक्षक ! हा उपक्रम सर्वात महत्त्वाचा आहे. कारण शिक्षण क्षेत्रात आज नेत्रदीपक प्रगती झाली आहे. ऑनलाईन शिक्षण आता कोरोना महामारीमुळे पर्याय होणार आहे. सुसज्ज इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वाचनालय आदी सुविधा नसताना पन्नास वर्षांपूर्वी ज्या शिक्षकांनी जी पिढी निर्माण केली, त्यांचे हे लेखनानुभव नवीन पिढीला मार्गदर्शक ठरतील.'' 
- सुरेश ठाकूर, शाखा अध्यक्ष 

 
संपादन - राजेंद्र घोरपडे