बिगुल वाजलं; भाजप विरुद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत चुरस

दोडामार्गात हालचालींना वेग; राजकीय पक्ष सक्रिय
BJP,Shivsena,Ncp, Congress Election
BJP,Shivsena,Ncp, Congress ElectionEsakal

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे (Nagaer panchayt Election) बिगुल वाजले आणि सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरवात केली. भाजप यावेळेला स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी येथे येत इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस यावेळेला शिवसेनेसोबत आहे. तथापि, सुरेश दळवी (Suresh Dalvi) यांनी संपर्क कार्यालय सुरू करुन निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

शिवसेना, मनसे आणि काँग्रेस आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहे. या वेळेला भाजप शिवसेना विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असे चित्र दिसणार नाही तर ते भाजप विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दिसण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार त्यांना एकत्र बांधून ठेवण्यास साह्यभूत ठरेल, असे वाटत असले तरी जागा वाटपावेळी त्यांच्यात कुरबुरीचे दर्शन घडण्याची भीती आहे. मागच्या वेळेला काँग्रेसने चार तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्या जागांवर ते दोन्ही पक्ष दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात त्यावेळी काँग्रेसमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे होते आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजपला मदत केली होती. आताही ते सर्वजण भाजपवासी असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीला नवे चेहरे रिंगणात आणून जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

BJP,Shivsena,Ncp, Congress Election
महावितरणचा शाॅक : राज्यातील पहिल्या विद्युत प्रकल्पाचीचं वीज तोडली

दरम्यान, गत निवडणुकीपेक्षा यंदा वातावरण वेगळे असल्याने लोकांना भावेल, ज्याची मतदारांमध्ये उठबस असेल म्हणजेच लोकमत ज्यांच्या बाजूने असेल अशांना उमेदवारी देणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागच्यावेळी भाजप आणि शिवसेनेमधून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी ऐनवेळी पक्षाशी गद्दारी करुन नगराध्यक्षपदासाठी काँगेसमधून उमेदवारी अर्ज भरलेल्या सदस्याला मतदान करुन युतीकडे बहुमत असूनही सत्ता काँगेस राष्ट्रवादीच्या हातात दिली होती. त्यावेळीं त्यांना मनसेच्या उमेदवारानेही साथ दिली होती. तसे होता नये यासाठी यावेळेला सर्व पक्षप्रमुखांनी काळजी घ्यायला हवी. संपर्क कार्यालयाच्या उद्घटनावेळी श्री. दळवी यांनी त्याकडे लक्ष वेधून तालुकाध्यक्षांना विश्वासघात न करणारे उमेदवार देण्याची सक्त ताकीदच दिली आहे. एकंदरीत यावेळची निवडणूक योग्य उमेदवाराची निवड, महाविकास आघाडीचे सूर जुळणे, प्रचाराची रणनीती आणि मतदारांची साथ यावर अवलंबून आहे. त्यात जो सरशी घेईल त्यांची सत्ता नगरपंचायतीवर असणारं यात दुमत नसावे.

आता प्रभाग रचनेत बदल

मागच्या वेळेला शिवसेना भाजपने प्रत्येकी पाच जागा जिंकल्या होत्या तर मनसेने एक जागा जिंकून खाते खोलले होते. या वेळेला चित्र काय असेल हे आताच सांगणे अवघड आहे. आता प्रभाग रचनेत बदल झाला आहे. अनेकांना सुरक्षित प्रभाग शोधावा लागेल. शिवाय या वेळचे प्रतिस्पर्धी पक्ष मागच्या वेळेपेक्षा वेगळे असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com