कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपाचा सुफडासाफ

कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या पाश्वभुमीवर शिवसेना-काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली.
कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपाचा सुफडासाफ
Updated on

कुडाळ - कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आफरीन करोल तर उपनगराध्यक्षपदि मंदार शिरसाट यांची निवड झाली. यावेळी फटाके फोडून, घोषणा देत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.    

कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपाचा सुफडासाफ
'बंगल्यावर आलात तर परत जाणार नाही म्हणालात, मी येऊन गेलो पण तुम्ही..'

दरम्यान, कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या काही मिनिटांआधी नगरपंचायत समोरील रोडवर शिवसेना-भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आमदार वैभव नाईक यांची गाडी शिवसेना-काँग्रेस नगरसेवकांना घेवून आत आल्याने शाब्दिक बाचाबाची होवून दोन्ही गटात फ्री स्टाईल झाली. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटांना थोपवण्यासाठी लाठीचा प्रसाद दिला. एकुणच यावेळी वातावरण तंग झाल्याने परिणामी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सर्वच पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना शंभर मीटर बाहेर काढल्यानंतर नगरपंचायत परिसर शांत झाला.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आफरिन करोल ९ मते, तर भाजपच्या प्राची बांदेकर ८ मते मिळाली आहेत. उपनगराध्यक्षपदी मंदार शिरसाट ९ मते मिळवत विजय झाला आहे. निवडीनंतर महाविकास आघाडीकडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या पाश्वभुमीवर शिवसेना-काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. याठिकाणी महाविकास आघाडीकडे ९ तर भाजपकडे ८ सदस्य आहेत.

शिवसेना ७ आणि काँग्रेसला २ असे मिळुन ९ सदस्य होते, तर भाजपकडे ८ सदस्य आहेत. दोन्ही बाजुकडुन नगराध्यक्ष आपलाच होणार असल्याचा दावा केला जात होता. शिवसेना-काँग्रेस महाविकास आघाडीकडुन आफरिन करोल तर भाजपकडुन प्राची बांदेकर रिंगणात उभ्या होत्या. तर उपनराध्यक्ष पदासाठी महाविकाआघाडीकडुन शिवसेना गटनेते मंदार शिरसाट तर भाजपकडुन निलेश परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर अपेक्षित संख्याबळाप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आली. सत्ता येताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपाचा सुफडासाफ
गनिमी काव्याने आलेल्या अतुल लोंढेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Driver’s Presence of Mind Prevents Disaster as ST Bus Nearly Overturns in Pali
Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Marathi News Esakal
www.esakal.com