बांदा : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी (Nagpur to Goa Shaktipeeth Highway) जमीन मोजणीसाठी आलेल्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना बांद्यातील संतप्त शेतकऱ्यांनी रोषाला सामोरे जावे लागले. भूसंपादन प्रक्रियेतील बाबीची कोणतीच पूर्तता न करता दडपशाही करत शेतकऱ्यावर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी उपस्थितानी केला. कोणतीही नोटीस न देता कोणत्या अधिकाराने जमीन मोजणी करता? असा सवाल करताच भूमी अभिलेखचे अधिकारी निरुत्तर झालेत. आधी महामार्गाची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांसमोर ठेवा, सर्व शंका दूर करा आणि नंतरच मोजणीसाठी या, असा सज्जड दम स्थानिकांनी अधिकाऱ्यांना भरत मोजणीची प्रक्रिया रोखली.