esakal | बांदा ते दोडामार्ग होणार 'औद्योगिक कॉरिडॉर'; नारायण राणेंचा महत्वपूर्ण निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा ते दोडामार्ग होणार 'औद्योगिक कॉरिडॉर'; राणेंचा निर्णय

बांदा ते दोडामार्ग होणार 'औद्योगिक कॉरिडॉर'; राणेंचा निर्णय

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्यात ( Goa) रोजगारासाठी जाणाऱ्या तरुण वर्गाला सिंधुदुर्गातच (Sindhudurg) रोजगार मिळावा यासाठी बांदा ते दोडामार्ग हा 'औद्योगिक कॉरिडॉर' करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नारायण राणे( Narayan Rane)यांनी सांगितले. बांदा( Banda)सरपंच अक्रम खान (Akaram Khan) यांनी राणे यांची दिल्ली (Delhi) येथे भेट घेऊन केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यावेळी खान यांनी तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी स्थानिक पातळीवर उद्योगधंद्यांची निर्मिती करण्याकरिता मंत्री राणे यांचे लक्ष वेधले. (narayan-rane-declared-industrial-corridor-established-banda-dodamarg-goa-konkan-political-news-akb84)

खान यांनी सांगितले, की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० हजारहून अधिक तरुण, तरुणी रोजगारासाठी गोवा राज्यावर अवलंबून आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर राज्यांच्या सीमा बंद असल्याने याचा सर्वाधिक फटका हा नोकरदारांना बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण जिल्ह्यातच थांबण्यासाठी येथील उद्योग प्रकल्पांना चालना देण्याची मागणी खान यांनी मंत्री राणे यांच्याकडे केली.

हेही वाचा: रडण्यातून घडली ती स्मृती आता प्रतिस्पर्धी संघाला रडवते!

मंत्री राणे म्हणाले, की बांदा, दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी परिसरातील सर्वाधिक तरुण नोकरीसाठी गोव्यात ये-जा करतात. यासाठी बांदा ते दोडामार्ग हा पट्टा औद्योगिक प्रकल्पांनी विकसित करण्याचा विचार आहे. याच दृष्टिकोनातून आडाळी येथे एमआयडीसीची पायाभरणी केली आहे. भविष्यात खासगी उद्योजकांच्या माध्यमातून उद्योग निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर उपस्थित होते. यावेळी खान व तोरसकर यांनी केंद्रीयमंत्री राणे यांना पुष्पगुच्छ व श्री बांदेश्वर यांची प्रतिमा भेट देऊन अभिनंदन केले.

loading image