मी बोलायला लागलो, तर तुम्हाला परवडणार नाही; नारायण राणेंचा इशारा

narayan rane
narayan ranesakal
Updated on: 

रत्नागिरी : मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. मला झालेली अटक बेकायदेशीर आहे. सत्तेची मस्ती दाखवण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. काही हरकत नाही दाखवा. भविष्यात महाराष्ट्रात आमचेच सरकार येणार आहे. नारायण राणे यांच्या पाठीमागे लागू नका, मी आत्ता थोडे बोलतोय, नाहीतर मी जर बोलायला लागलो तर ते तुम्हाला परवडणार नाही. असा सूचक इशारा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. रत्नागिरीत पत्रकारांशी ते बोलत होते.

Summary

मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. मला झालेली अटक बेकायदेशीर आहे.

पुढे ते म्हणाले, जन आशीर्वाद यात्रेमुळे लोकांचे प्रश्न जाणून घेता आले. जन आशीर्वाद यात्रे नंतर पंतप्रधान मोदींना अहवाल सादर करणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. कोकणाच्या सुपुत्राला केंद्रात मंत्रीपद दिले. मी त्यांचा आभारी आहे. जन आशीर्वाद यात्रेसाठी रत्नागिरीत आलो. मोदी यांच्या सूचनेनुसार केलेली कामे, जनतेचे प्रश्न, वादळ, पुरामुळे निर्माण झालेले प्रश्न जाणून घेण्यासाठी मी आलो आहे.

narayan rane
'आपल्याच वहिनीवरती ॲसिड फेकण्यास कोणी सांगितलं?'

कायदा सुव्यवस्था राज्यात नाही. खून मारामाऱ्या होताहेत. सुशांत हत्या, दिशा सालीयन बलात्कार करून हत्या, खरे आरोपी मिळणार नाहीत. मी मुख्यमंत्री झालो. पहिले पद यांनीच दिले. ३९ वर्ष सोबत होतो, सगळं ठाऊक आहे काय काय घडलंय, माझ्यावर बोलू नका. साहेबांना अतिरेकी धोका होता. तेव्हाच सुपुत्र्याच्या घरावर आलेल्या चिव सैनिकांचा सत्कार केला. यावेळी सरदेसाई यांना पोलिसांनी चोपले.

शिवसेनेने कोकणाला काय दिलं. पुनर्वसन केल नाही. त्यांचा कारभार जनतेला दाखवणार. पिंजऱ्यात राहून राज्य चालवाणारे एकमेव उदाहरण आहे. आता थोडं थोडं काढूयात. कोकणात औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार. सबसिडी योंजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार. असे ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com