नर्मदा परिक्रमा म्हणजे मानसिक तपश्चर्या

नर्मदा परिक्रमा म्हणजे मानसिक तपश्चर्या

Published on

rat26p34.jpg
86004
रत्नागिरीः नर्मदा परिक्रमेबाबत अनुभव सांगताना नेहा देशकुलकर्णी व मधुरा चिंचाळकर. सोबत कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी.
-------
नर्मदा परिक्रमा म्हणजे मानसिक तपश्चर्या
देशकुलकर्णी, चिंचाळकर ः कुवारबाव ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात अनुभव कथन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : नर्मदा परिक्रमा ही एखादी सहल नसून आध्यात्मिक शक्तीच्या बळावर, शारीरिक समस्यावर मात करत पूर्ण केलेली मानसिक तपश्चर्या होय. १२० दिवसांच्या नर्मदा परिक्रमेमुळे सेवाभाव, भक्ती आणि श्रद्धा याद्वारे जन्मोजन्मीचे ऋण फेडण्याचे मिळालेले भाग्य होय, अशा शब्दांत नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या मिरजोळे येथील नेहा देशकुलकर्णी व मधुरा चिंचाळकर या ज्येष्ठ महिला भगिनींनी भावना व्यक्त केल्या.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक स्नेह मेळाव्यात त्यांनी अनुभव कथन केले. सौ. चिंचाळकर व सौ. देशकुलकर्णी यांनी प्रतिदिनी २० ते २५ किलोमीटर प्रमाणे १२० दिवसांच्या सुमारे साडेतीन हजार किलोमीटर नर्मदा परिक्रमेच्या प्रवासाचे चित्तथरारक अनुभव कथन केले. छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यातून २०५६ किलोमीटर अंतर वाहणाऱ्या नर्मदा नदीचे पावित्र्य सर्वत्र भक्तीभावाने जपले जाते. डोंगरदऱ्या जंगल दुर्गम ग्रामीण परिसर आणि नर्मदा तीरावरून प्रवास करताना दमछाक होते. मात्र अज्ञात अध्यात्मिक शक्तीमुळे मानसिक बळ मिळते, असे अनुभव कथन करून त्यांनी नर्मदा परिक्रमा तरुणांबरोबरच ज्येष्ठांनीही मात्र योग्य वयात जरूर अनुभवावी, असे आवाहन केले.
संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. या वेळी सौ. चिंचाळकर व सौ. देशकुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. श्यामसुंदर सावंत देसाई यांनी १५ जून रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनाची संकल्पना विशद केली. पुढील स्नेहमेळावा २९ जून होणार आहे. संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, सचिव सुरेश शेलार, सुधाकर देवस्थळी, वसंत पटवर्धन, प्रभाकर कासेकर, नारायण नानिवडेकर, शशिकांत घोसाळकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com